क्राईम
पुन्हा गोळीबाराचा थरार

आधी कल्याण मग मुंबईमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने नागरिकांमध्ये घबराट परसली आहे. मुंबईतील गोळीबाराचा थरार अनेकांनी लाईव्ह पाहिला. त्यानंतर याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता आणखी एक चित्तथरारक गोळीबाराची घटना समोर आली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये देखील शुक्रवारी गोळीबार झाला आहे. एका सलूनमध्ये तीन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. दरम्यान या घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या थरारक घटनेने आता दिल्ली देखील हादरली आहे.
पोलीस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिल्लीतील नजफगडमधील एका सलूनमध्ये ही घटना घडली आहे. सदर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.