सोलापूर
तुला मस्ती आली का?

सोलापूर (प्रतिनिधी) घराजवळील बाथरूममध्ये गुटखा खाऊन थुंकल्याच्या कारणावरून चार जणांनी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बल्लारी चाळ जुना देगाव नाका लक्ष्मी पेठ येथे घडली. याप्रकरणी दत्तकुमार सिद्राम पालके (वय-३१,रा.बल्लारी चाळ,जुना देगाव नाका) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अशोक सिद्राम पालके, सिद्धाराम पोटगुळे, निरंजन उद्दल, राजू पोटगुळे (सर्व.रा.बल्लारी चाळ, जुना देगाव नाका) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या घराजवळील बाथरूममध्ये गुटखा खाऊन थुंकल्याच्या कारणावरून फिर्यादी यांचा भाऊ अशोक पालके याच्यासोबत वाद विवाद झाला. त्यावेळी अशोक याने फिर्यादी याला तू घर सोडून जा नाहीतर बघ असे म्हणून दमदाटी केली.
त्यावेळी वादविवाद चालू असताना घराशेजारी राहणारे सिद्राम पाटगुळे आणि निरंजन उद्दल हे भांडण सोडवण्यासाठी आले असता, त्यांना फिर्यादी यांनी आमच्या मॅटरमध्ये पडू नका असे म्हणल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून तुला मस्ती आली का असे म्हणून गच्ची पकडून हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच राजू पाटगुळे याने फिर्यादीच्या डोक्यावर पाणी गरम करण्याचे भांडे मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास मपोना.चौधरी या करीत आहेत.