खेळ
शानदार…जबरदस्त…झिंदाबाद!
वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दिमाखात एन्ट्री केली. विश्वचषकाचा पहिला सेमी फायनल सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड संघ 327 धावांवर गुंडाळला गेला आणि भारताने 70 धावांनी विजय मिळवला. शमीच्या नावावर खास विक्रमाची नोंद देखील झाली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 50 षटकांमध्ये भारताने 4 विकेट्सच्या नुकसानावर 397 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ 48.5 षटकांमध्ये 327 धावांची खेळी करून सर्वबाद झाला.
या सामन्यातील अप्रतिम प्रदर्शनासाठी शमीला सामनावीर पुरस्कार मिळाला. शमी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विश्वचषक स्पर्धेतील एखाद्या सामन्यात 7 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच एकंदरीत विचार केला तर विश्वचषक सामन्यात 7 विकेट्स घेणारा तो पाचवा गोलंदाज बनला आहे.
इथे हि वाचा