महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्याचा बारावीचा निकाल 91.88 टक्के

इयत्ता बारावी महाराष्ट्र बोर्डचा निकाल जाहीर दुपारी एक वाजता होणार असला तरी तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये परिक्षार्थींसह उत्तीर्ण झालेल्यांची आकडेवारी सांगण्यात आली आहे. 14 लाख २७ हजार 85 विद्यार्थ्यांनी परिक्षेला अर्ज केला होता. त्यापैकी प्रत्यक्ष 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यामधून 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88 टक्के इतकी आहे.

विभागनिहाय निकाल काय? पुणे – 91.32 टक्के, नागपूर – 90.52 टक्के, संभाजीनगर – 92.24 टक्के, मुंबई – 92.93 टक्के, कोल्हापूर – 93.64 टक्के, अमरावती – 91.43 टक्के, नाशिक – 91.31 टक्के, लातूर – 89.46 टक्के, कोकण – 96.74 टक्के.

यंदा बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 94. 58 टक्के आहे. तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51आहे.

Related Articles

Back to top button