महाराष्ट्र
नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान ; सुप्रिया सुळे
देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. आपण देशात कुठेही पाहिले तर आपल्या भीती, द्वेष आणि हिंसा पाहायला मिळेल. त्यामुळे भाजपने पसरवलेल्या भिती, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात हल्लाबोल केला होता.
दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारत जोडोचे स्वागत केले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. ते माझे आवडते पंतप्रधान आहेत, असेही सुळे म्हणाल्या. केंद्र सरकार काही गोष्टी चांगले करत आहे, असे त्या म्हणाल्या.