सोलापूर
बापरे! सोलापूर @ 14.6 ; थंडीचा जोर वाढला
सोलापूर शहरातील थंडीचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय रात्रीच्या तापमानात दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडी वाढल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात पुढील दोन दिवसात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. परिणामी राज्यातील तापमानात आणखी घट होणार आहे. पुण्यात गेल्या काही दिवसापासून थंडी वाढत आहे. चालू महिन्यात पुण्यात तापमान 12 अंश डिग्री सेल्सिअस ते खाली गेले होते. येत्या 23 नोव्हेंबर पासून थंडीचा कडाका वाढणार आहे. दरम्यान काल सोलापुरात 14.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. शहरात थंडीचा कडाका वाढत आहे.