महाराष्ट्र

जोपर्यंत सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे हिरो, यात शंकाच नाही

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असे वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवप्रेमींच्या टीकेचे धनी बनले आहेत. अशातच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारची कोंडी करण्यास सुरूवात केली आहे.
विरोधकांच्या आक्रमकतेमुळे शिंदे सरकार बॅकफूटवर आले आहे. या विधानांवरून विरोधकांकडून सरकारवर टीका सुरू आहे. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. यावेळी त्यांनी थेट राज्यपालांचे कान टोचले. एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर आहे तोपर्यंत महाराष्ट्र आणि देशाचे आणि आमच्या सर्वांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत.
आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही. त्यामुळे मी असे मान्य करतो की यावर काही वाद होण्याचे कारण नाही, असे म्हणत फडणवीस यांनी राज्यपालांचे कान टोचले.

Related Articles

Back to top button