हवामान
राज्यात तापमान वाढता वाढता वाढे!

- राज्यातील तापमानात सध्या चांगलीच वाढ होत आहे. राज्याच्या विविध भागातील तापमानाने आधीच चाळीशी ओलांडली असून आता पारा वेगाने पन्नाशीकडे जाताना दिसत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंशांच्यावर गेल्याची नोंद आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार नंदूरबारमध्ये पारा तब्बल 45.3 अंशांवर स्थिरावला आहे. तर जळगाव, अकोल्यात 43.7 अंशांची नोंद झाली. संपूर्ण राज्यात उष्णतेचा त्रास वाढला आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तपमानाने उच्चांक गाठला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 42.5 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमान नेहमीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.
- किमान तापमानही प्रचंड वाढल्यामुळे सकाळी साधारण 9 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसू लागला आहे.