देश - विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

  1. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशातात खळबळ माजली. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. आता पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. खोऱ्यात राष्ट्रीय महामार्गाला लक्ष्य करून संभाव्य दहशतवादी हल्ल्यांबाबत विश्वसनीय गुप्तचरांकडू माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट जारी केला आहे. 
  2. दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सैन्य दहशतवाद्यांना शोधून काढताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ‘दहशतवादविरोधी मोहीम’ राबवण्यात आल्या आहेत. तसेच दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आले.

Related Articles

Back to top button