राजकीय
अजितदादा गटाच्या ‘या’ नेत्याला अटक

- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामकृष्ण बांगर यांना पोलिसांनी अटक केली आहे. बाजार समितीतील घोटाळा प्रकरणी त्यांना वाशीम येथून अटक करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात पाटोदा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- बीडच्या पाटोदा बाजार समितीच्या मालकीचा भूखंड, बेकायदेशीररित्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणीबांगर यांना अटक करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी पाटोदा पोलिस ठाण्यात बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्यांच्या मागावर होते. अखेर त्यांना पोलिसांना अटक केली आहे.
- बांगर यांच्यावर बाजार समितीच्या भूखंड प्रकरणाबरोबरच महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांगर यांच्यासह तब्बल ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून बांगर हे फरार होते. त्यांच्या मागावर असलेल्या पथकाने वाशीम येथील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली आहे.



