राजकीय

२०२४ ला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार?

माझ्या कार्यक्रमाची पाहाणी करून नागपूरला जातो आणि बावनकुळे यांची भेट घेतो किंवा ते मुंबईला येणार असतील तर भेटतो आणि काय काम करावे लागते? कसे काम केल्याने पक्ष आपल्याला तिकिट देतो? कसं काम केले नाही तर पक्ष तिकिट नाकारतो? आपल्यालाही नाकारतो पत्नीलाही नाकारतो, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केले होते. त्याच्या वक्तव्यानंतर अजितदादा यांनी जयंत पाटलांच्या तोंडामध्ये साखर पडो आणि त्यांचे म्हणणे खरं ठरो, असे मिश्किल उत्तर दिले.

Related Articles

Back to top button