हवामान

ब्रेकिंग! पुढील पाच दिवस राज्याला अवकाळीचा दणका

राज्यासह देशभरात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज व्यक्त केला असून, शुक्रवार पाच मेपर्यंत देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात सर्वाधिक पाऊस पडेल, असा अंदाज आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती.

अनेक भागात पारा चाळीशीच्या पुढे गेला होता.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुढील पाच दिवसही महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीचा अंदाज आहे. हवामान खात्यानुसार, महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजाही पडू शकतात. अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अवकाळीमुळे पुढील पाच दिवस कच्चा घरे, भिंती, झोपड्या कोसळण्याच्या घटनाही समोर येणार आहेत.

Related Articles

Back to top button