मनोरंजन
आता वेळ आलीये…

- अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनानंतर तिची अखेरची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. तिचे चाहते ही पोस्ट पाहून भावुक होत आहेत. कांटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफालीने यात अखेरचा फोटोशूट शेअर केला होता.
-
शेफालीने आपल्या मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी हा फोटोशूट शेअर केला होता आणि त्याचे कॅप्शन “Bling it on baby” (आता वेळ आलीये…)असे लिहिले होते. तिचे हे फोटो फोटोग्राफर कुणाल वर्मा यांनी काढले होते, ज्यांना शेफालीने कॅप्शनमध्ये क्रेडिट दिले होते.
- आपल्या अखेरच्या फोटोशूटमध्ये ‘कांटा लगा’ गर्लने सुंदर सिल्व्हर आउटफिट परिधान केला होता, जो नम्रता जोशीपुरा यांनी डिझाइन केला होता.
- शेफाली आपल्या अखेरच्या फोटोशूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. शेफाली ही मनोरंजन विश्वात आपल्या नृत्यासाठी प्रसिद्ध होती. तिने २००२ मध्ये रीमिक्स म्युझिक व्हिडिओ ‘कांटा लगा’ द्वारे प्रेक्षकांमध्ये अशी छाप पाडली होती, जी लोक आजतागायत विसरू शकले नाहीत. आजही लोक तिला ‘कांटा लगा’ गर्ल म्हणूनच ओळखतात.



