राजकीय
संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते…

- भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
राऊत यांनी युवा सेना प्रमुखपदावरून आदित्य आणि तेजस ठाकरे या दोन भावांमध्ये भांडणं लावली आहेत. शिवसेनेत आदित्य आणि वरुण सरदेसाई यांचा प्रभाव वाढतोय म्हणून राऊत आणि त्यांच्या टोळीने षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी राऊतांवर केला.
राणे म्हणाले की, २०१९ ला राऊत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या माध्यमातून स्वतःच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. दरम्यानशरद पवारांनी हा प्रस्ताव ठाकरेंसमोर ठेवला. उद्धव ठाकरेंच्या मनात काहीतरी वेगळंच असल्यामुळे त्यांनी राऊतांचे नाव नाकारले.



