राजकीय
मोठी बातमी! महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण ?

- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्रीपद या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमक चालले तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केले आहे. आगामी काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होईल, हे जवळपास सर्वानी मान्य केले, असं त्यांनी म्हटले आहे.
अजितदादा, मी आणि आमच्या पक्षाचे सर्वच नेते राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार, हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. त्यामुळे मला खात्री आहे कि, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये राष्ट्रवादी महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, पाटील यांनी म्हटले आहे.



