राजकीय
शिवसेना संपवण्याचाच डाव होता अन्…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र्याचा दुसरा भाग 2 मे रोजी प्रकाशित होणार आहे . या दुसऱ्या भागामध्ये पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 2019 नंतर शिवसेना आणि भाजपमधील अंतर कसे वाढले आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला याचा फायदा कसा झाला, हे पवारांनी आपल्या पुस्तकात सांगितले आहे. शिवसेनेचे वर्चस्व संपवण्याचाच राजकीय हिशोब भाजपचा होता, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना शिवसेनेबद्दल कोणताही स्नेहभाव नाही, असे पवारांनी म्हटले आहे.
शिवसेनेला संपवल्याशिवाय भाजप वाढणार नाही. हाच हिशोब होता. स्वबळावर सत्ता मिळवून सेनेचे ओझ उतरवण्याचा भाजपचा चंग होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह याना शिवसेनेबद्दल कोणतीही सहानभूती नव्हती.
विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019 नंतर चित्र बदलले. 2019 मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझं उतरवून ठेवायचे असा चंग भाजपने बाळगला होता.
नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपने केले. राज्यातील 50 मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान होतं. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले बंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते. मोदी आणि शाह या दोन्ही नेत्यांच्या मनात शिवसेनेबद्दल कोणतीही सहानभूती नव्हती. शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागांतून तिचे उच्चाटन केल्याशिवाय राज्यात निर्विवाद वर्चस्व स्थापन करता येणार नाही, असा भाजपचा राजकीय हिशेब होता. भाजप आपल्या अस्तित्वावर उठला आहे, असा तीव्र संताप शिवसेनेत होता. परंतु सत्तेत एकत्र असल्यामुळं त्याचा उद्रेक झाला नाही. मात्र यावरून आग धुमसत होती, असा दावा पवारांनी केला. भाजप- शिवसेना यांच्यातील वाढलेले अंतर आमच्यासाठी शुभ संकेत होते, असेही पवारांनी म्हटले आहे.