क्राईम
गुन्ह्यात साक्षीदार व्यावसायिकाचा गोळी झाडून खून

- एका 35 वर्षीय व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे हे व्यावसायिक एका गुन्ह्यात साक्षीदार असल्याचे सांगितले जात आहे.
- मुंबईतील मीरा रोडवर या घटनेनंतर पोलिसांनी आपला तपास सुरु केला असून संशयित आरोपी कोण आहेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान आरोपीची ओळख पटवण्यासाठी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.
- मुंबईतील मीरा रोडवर असलेल्या शॉपिंग सेंटरजवळ खुनाची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री काही अज्ञात लोकांनी या पस्तीस वर्षीय व्यावसायिकावर धाडधाड् गोळ्या घातल्या आणि त्यांचा खून केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
- व्यावसायिक असलेले तबरेज अन्सारी असे मृताचे नाव आहे. शॉपिंग सेंटरमध्ये त्यांचे चष्म्याचे दुकान होते. अन्सारी हे एका गुन्ह्यातील साक्षीदार होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही येत होत्या. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
- घडलेल्या घडामोडीनुसार, काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी येऊन अन्सारी यांच्या डोक्यात गोळी झाडली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून आरोपीची ओळख पटविण्यासाठी जवळील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासत आहेत.