ब्रेकिंग! नागपुरात हिंसाचार प्रकरणी तगडी कारवाई

नागपूर शहरातील महाल भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या दंगलीतील आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मास्टरमाईंड फहीम खान आणि अन्य आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर पोलिसांनी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम आणि इतरांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासा दरम्यान 172 हून अधिक व्हिडिओ पुरावे सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामधून आरोपींची ओळख पटवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओंच्या मदतीने पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर धरपकड केली जात आहे.
नागपूर दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 51 आरोपींपैकी 24 जण हे महाल, भालदारपुरा, चिटणीसपार्क, हंसापुरी या प्रभावित भागाचे रहिवासी नसल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार हे आरोपी नागपूरच्या कळमना, पारडी, उमरेड रोड, वाठोडा, यशोधरा नगर, टेकनाका, जाफर नगर, बंगाली पंजा आणि ताजबाग परिसरातील आहेत.
यामुळे महाल भागातील हिंसा घडवणाऱ्यांमध्ये स्थानिकांपेक्षा बाहेरील लोकांचा जास्त सहभाग होता, असे समोर आले आहे.



