महाराष्ट्र

औरंग्याची कबर तोडण्यासाठी तमाशा नको

  1. मुगल सम्राट औरंगजेबची कबर कायमची उद्ध्वस्त करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने आंदोलन करण्याची धमकी दिली. कबर हटविण्यासाठी कारसेवा करण्याची योजना जाहीर केली.
  2. औरंग्याच्या कबरीची तुलना ते अयोध्येतील बाबरी मशिदीशी करत आहेत. बाबरीप्रमाणे औरंग्याची कबर तोडू असे हे लोक सांगतात. त्यासाठी हे लोक कुदळ, फावडी, पहारी, जेसीबी, बुलडोझर वगैरे गोळा करायला लागले. ही सरळ सरळ नौटंकी आहे. औरंग्याची कबर तोडायला हा तमाशा करण्याचे कारण नाही. औरंग्या कबरीखाली आहे आणि तो काही उठून बाहेर येत नाही, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.
  3. कबरीस आता राज्य राखीव सुरक्षा दलाचे संरक्षण आहे. ही कबर भारताच्या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असल्याने त्याचे बाप केंद्रात बसले आहेत. केंद्राने लगेच हे संरक्षण हटवावे आणि कबरीस जो संरक्षित वास्तूचा दर्जा दिला तो काढून घ्यावा. म्हणजे ही जमीन मोकळी होईल आणि संघर्षाचा भडका उडणार नाही, असे ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
जॉईन व्हाट्सअप ग्रुप