महाराष्ट्र

अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे ५६ पायाला बांधून फिरते

  • दिशा सालियान प्रकरणावरुन आज सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दिशा सालियान प्रकरणावर जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांकडून नाव न घेता थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष केले जात असून विरोधी पक्षातील आमदार ठाकरेंच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी आमदार चित्रा वाघ यांचे नाव घेतल्याने चित्रा वाघ संतापल्या.
  • महायुतीमधील मंत्री संजय राठोड, जयकुमार गोरे यांच्या केसबाबत कोणी बोलत नाही, त्यांचा राजीनामा घ्या, विरोधीपक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसेही दाबू नका, असे म्हणत परब यांनी सरकारला टार्गेट केले. तसेच चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला. त्यानंतर चित्रा वाघ यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. मी ५६ परब पायाला बांधून फिरते, असे त्या म्हटल्या.
  • संजय राठोड का मंत्रिमंडळात आहेत त्याचे उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंना विचारा, संजय राठोड यांना का क्लिनचिट दिली. असेल हिंमत तर विचारा त्यांना, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी सभागृहात परब यांच्यावर पलटवार केला. तसेच माझं नाव घेऊन बोलण्यात आले, त्यामुळे मी परब यांना उत्तर देत आहे. तुम्ही असाल पोपट पंडित. माझ्या कुटुंबाने दोन वर्ष जे सहन केले, तुमच्यासारखे ५६ परब पायाला बांधून फिरते, आम्ही वशिल्याने इथं आलेलो नाही आहोत, असे म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहात परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Related Articles

Back to top button