राजकीय

ब्रेकिंग! स्वत:च स्वत:चे 19 बंगले गायब केले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कथित 19 बंगले प्रकरणावरून भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे यांनी स्वत:च स्वत:चे 19 बंगले गायब केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि 19 बंगल्यांची चौकशी मुख्यमंत्री शिंदे यांनी करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
मुख्यमंत्री म्हणून स्वत:च 15 जानेवारी 2021 ला चौकशीचे आदेश दिले. चौकशी कुणी करायची, कशी करायची, कुठे करायची, काय करायची, हे ठाकरे यांनीच ठरवले, असे सोमय्यांनी सांगितले.
त्यानंतर चौकशीच्या नावाने बंगले गायब झालेल्या जागेचे फोटोसेशन केले आणि त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button