बिजनेस

200MP कॅमेरासह सॅमसंगचा Galaxy S23 Ultra लाँच

Samsung Galaxy S23 ultra हा फोन सगळ्यात पॉवरफुल समजला जात आहे. थक्क करणाऱ्या फिचर्समुळे हा फोन खरेदी केला जात आहे. यामध्ये 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्ससह 200-मेगापिक्सलचा फ्रंट वाइड कॅमेरा आहे. 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा सेन्सर आहे. 10 ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आणि 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आहे.
सेल्फी आणि व्हिडिओ कॅलिंगसाठी 12 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे. या फोनमध्ये येणारा डिस्प्ले हा एकदम जबरदस्त आहे. फोनमध्ये 1-120 च्या डायनॅमिक रीफ्रेश रेटसह एज क्वाडएचडी डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. यामध्ये 5000 MH बॅटरी 45 वॅट वायर्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. 15 वॅट फास्ट वायरिंग 2.0 ला सपोर्ट करत. फास्ट चार्जिंगचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 20 मिनिटांत बॅटरी 65 टक्के चार्ज होईल, असा दावा केला आहे.  याची किंमत 98 हजार 300 रुपये आहे.

Related Articles

Back to top button