महाराष्ट्र
…म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळले

काँग्रेसमधील फुटीचे खापर नाना पटोले यांच्यावर फोडल्यानंतर माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्यामागेही नाना पटोलेच दोषी असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडले नसते तर महाविकास आघाडी सरकार कोसळले नसते, असे देशमुख म्हणाले आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ आणि समजूतदार नेत्याला डावलून भाजपातून आलेल्या पटोले यांना चार वर्षांत महत्त्वाची आठ पदं का दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.