कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर भाजपला मोठे धक्के बसत आहेत. आज भाजपला दुसरा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात धरला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष डी.के. शिवाकुमार, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि सिद्दरामया यांच्या उपस्थितीत शेट्टार यांनी आज बंगळुरूत काँग्रेस प्रवेश केला.
शेट्टार यांनी काल भाजपचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. भाजपच्या हायकमांडने त्यांना राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी नाकारली. पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करण्यापूर्वी बंगळुरूमधील पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
ब्रेकिंग! कर्नाटकात भाजपला दुसरा धक्का
