सोलापूर

एकच नंबर! ऋषभ पंतसाठी देवदूत ठरलेल्या ‘त्या’ दोघांचा प्रजासत्ताकदिनी होणार सत्कार

भारतीय संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंतचा काल भीषण कार अपघात झाला. यात पंतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या ऋषभची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकिकडे ऋषभची स्थिर प्रकृती आहे तर, दुसरीकडे ऋषभला या अपघातातून जीवदान देणाऱ्यांवर सर्वच स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
कारण जळत्या कारमधून बाहेर काढत दोन तरुणांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या दोन तरुणांचा प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे.
ऋषभच्या अपघातानंतर त्याठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेल्या बसच्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेत ऋषभला जळत्या गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर या तरुणांनी रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका बोलावली.

त्यानंतर पंतला पहिल्यांदा नजीकच्या आणि त्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ऋषभसाठी देवदूत ठरलेल्या या दोन तरुणांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात असून, त्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तराखंडचे परिवहनमंत्री मूलचंद शर्मा यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button