सोलापूर

तरुणांनो, पाकिस्तनाचा छुपा अजेंडा ओळखा ; फडणवीस म्हणतात…

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात दारू प्यायली जाते. यामुळे युवा पिढीवर परिणाम होतो. तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवले पाहिजे. त्यामुळे मी असे म्हणेन की, तरुणांनी दारू नाही तर मसाला दूध पिऊन नववर्षाचे स्वागत करायला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. व्यसनमुक्त बीड अभियानात फडणवीस बोलत होते.

तरुणांना व्यसनमुक्त करणे आवश्यक आहे. एखादा समाज संपवायचा असेल तर त्या समाजातील तरुणाईला व्यसनाधीन करा. मग आपोआप समाज संपतो. पण समाजाला उभे करायचे असेल तर सुखासिनतेपासून आणि व्यसनांपासून दूर करावे लागेल.
त्यांनी पाकिस्तनाचा छुपा अजेंडाही तरुणांना सांगितला. आज आपण पाहतो, आपल्या देशाशी युद्ध करता येत नाही म्हणून पाकिस्तान छुपे युद्ध करतो. आपल्या देशामध्ये अंमली पदार्थ पाठवायचे आणि तरुणाईला व्यसनाधीन केले जात आहे.
पाकिस्तानच्या लगत असलेल्या पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पाठवले गेले. मोठ्या प्रमाणात तरुणाईला व्यसनाधीन केले गेले. दुष्मनांशी मुकाबला करताना तरुणाई व्यसनाधीन असेल तर ती लढणार कशी, लढण्यासाठी त्यांनी व्यसनमुक्त असणे गरजेचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

Related Articles

Back to top button