सोलापूर
घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार; सोमय्यांनी घेतली थेट पाच नेत्यांची नावे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. येत्या नवीन वर्षात पुन्हा एकदा घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असे म्हणत त्यांनी 5 नेत्यांची थेट नावंच जाहीर केली आहेत.यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय, अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, काँग्रेसचे अस्लम शेख यांच्या नावाचा समावेश आहे. सोमय्या ट्विटमध्ये म्हणतात, उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे.
ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले, अनिल परब साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ, अस्लम खान यांचे ४९ स्टुडिओ, किशोरी पेडणेकर एसआरए फ्लॅट्स, मुंबई महापालिका घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असे म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे.