२०२२ वर्षाचा अखेरचा दिवस ठरतोय ‘अपघात’वार; 16 जणांचा मृत्यू

सर्वत्र नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी केली जात आहे. एकिकडे आनंदमयी वातावरण आहे, तर दुसरीकडे याच आनंदाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळते आहे. कारण वर्षाचा शेवटचा दिवस हा अपघाती ठरत आहे. कारण विविध अपघातात 16 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 68 जण जखमी झाले आहेत.
औरंगाबाद आणि शिर्डी येथे सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा बारामतीमध्ये अपघात झाला.
बारामतीच्या सांगवी रस्त्यावर सहलीच्या बसला अपघात झाला. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. गुजरातच्या नवसारीमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाला. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने गुजरातच्या वेस्मा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. तसेच, 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस अहमदाबादहून मुंबईला जात होती.
नंदुरबारच्या खोकसा घाटात पिकअप गाडी उलटल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाला. हे मजूर धुळे जिल्ह्यातील उमरपाटा गावाला जात होते. कामावरून परतत असताना हा अपघात झाला.
पुणे बंगळुरु महामार्गावर वारजे पुलावर झालेल्या अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झाला. वारजे नदी पुलावरून धायरीकडे जात असताना यवतमाळ एकाला ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं संकल्पचा जागीच मृत्यू झाला.
नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबईच्या भांडुप येथून बाईकवरून निघालेल्या दांम्पत्याचा मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या अपघातात सहा वर्षाची चिमुकली बचावली.