राजकीय

ब्रेकिंग! अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत जवळपास 30 वर्षांनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालीअसून, राज्यात 65.02 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल 30 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 1995 मध्ये 71.69 टक्के मतदान झाले होते. मतदान पार पडल्यानंतर प्रमुख संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा कल दिला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीनेदेखील आम्हीच सत्तेत येऊ असा दावा केला आहे. त्यामुळे एक्झिट पोल कितपत खरे ठरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोल्हापूरमधील कागल मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ पिछाडीवर गेले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व मंत्री धनंजय मुंडे हे २ हजार मतांनी आघाडीवर आहेत.मुंबईतील वरळी मतदारसंघातून माजी मंत्री व ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. तर, येवल्यात छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे. ते पिछाडीवर गेले आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुती 142 जागांवर आघाडीवर तर महाविकास आघाडी 130 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Related Articles

Back to top button