सोलापूर
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघाताचा थरार

पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील बाखारी येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक देत फरफटत नेले.
रोहित प्रकाश पोकळे (वय 30 वर्ष) याच्या कमरेवरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज मधुकर पेटाडे, विजय श्रीनिवास क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण पुणे येथील रहिवाशी आहेत. ट्रक चालकाने दारु प्यायल्याची माहिती मिळत आहे.
पेटाडे यांच्या कारने चार मित्र देवदर्शनासाठी सोलापूरकडे निघाले होते. दरम्यान कार गरम झाल्याने दौंड तालुक्यातील बाखारी येथे रस्त्याच्या बाजूला सर्वजण थांबले होते. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक देत फरफटत नेले.
दरम्यान रोहितच्या कमरेवरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पेटाडे याला कारसह फरफटत नेल्याने तो गंभीर झाला. क्षीरसागर याला देखील गंभीर इजा झाली आहे.