महाराष्ट्र
पुण्याच्या आकाशात विमानांच्या तुफान ‘घिरट्या’

- पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानने अंतर्गत युद्धाची तयारी सुरू केली आहे. युद्ध होणार असल्याने नागरिकांना खबरदारी म्हणून काय करायचे याची माहिती सातत्याने देण्यात येत आहे. अशातच आता पुण्याच्या आकाशात सतत विमानाच्या घिरट्या दिसत असल्याने पुणेकरांमध्ये याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
- पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विमानासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. परिणामी, उत्तर भारतातून दिल्ली, लखनऊ व अमृतसर विमानतळावरून उत्तर अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी आता महाराष्ट्राच्या व काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पुण्याच्या आकाशात विमानांची संख्या वाढली आहे. तब्बल 200 ते 250 विमान आकाशात घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.