सोलापूर

सुषमा अंधारे वाघीण नाही तर माकडीण

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या वाघीण नसून माकडीण, अशी बोचरी टीका शिंदे गटात सामील सामील झालेल्या उपनेत्या आशा मामिडी यांनी केली आहे. यामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

अंधारे यांनी या व्हिडीओत संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांवरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय महानुभाव पंथाने घेतला आहे. माफी मागितल्यानंतर देखील विरोधाची धार कमी न झाल्यामुळे ठाकरे गट अडचणीत सापडला आहे.

Related Articles

Back to top button