तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जाता आणि तिथं तुम्हाला पॅनकार्ड मागितलं जातं आणि तुमच्याकडे पॅनकार्ड नसतं. अशावेळी काय करावे सुचत नाही. म्हणूनच तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे, कारण आम्ही तुम्हाला फक्त 48 तासांत पॅनकार्ड मिळवण्याची प्रोसेस सांगणार आहोत. पॅनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
ही वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला पॅनकार्ड नवीन बनवायचं आहे की जुने पॅनकार्ड अपडेट करायचं आहे हे लिहावं लागेल. यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकावं लागेल. जन्मदिनांक टाकावी लागेल. ईमेल,मोबाईल नंबर टाकावा लागेल. ही बेसिक माहिती भरून अर्ज सबमीट करावा.
यासोबत तुम्हाला फी भरावी लागते. देशातील नागरिकांसाठी जीएसटीशिवाय 93 रूपये फी आहे. तर इतर देशातील नागरिकांसाठी 864 रूपये फी आहे. फी भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कागदपत्रेही पाठवावी लागतील. तुम्ही पाठवलेल्या कागदपत्रांची पडताळणी होते. जर सर्व कागदपत्रे बरोबर असली तर तुम्हाला दोन दिवसांत पॅनकार्ड दिले जाते.