सोलापूर
ब्रेकिंग! पंढरपुरात भीषण अपघात : दोन चिमुकल्यांसह पाच ठार

सध्या सोलापूर जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पंढरपुरात काल रात्री उशिरा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांसह तीन महिलांचा मृत्यू झाला.
करकंब परिसरातील ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याने ही दुर्घटना घडली. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
कामगारांचा आरडा ओरडा ऐकून स्थानिक लोकांनी अपघात स्थळी धाव घेतली. यातील जखमींवर करकंब येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.