सोलापूर

नरेंद्र मोदीच बनणार पुन्हा पीएम

येत्या काळात होणाऱ्या राजकीय घडामोडीवर ज्योतिषी, कुंडली अभ्यासक वेदमूर्ती अनंत पांडव यांनी भविष्यवाणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या नेत्यांच्या राजकीय वाटचालींवरही त्यांनी भविष्यवाणी केली आहे.
मोदी देशाच्या पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा विराजमान होतील.

2028 पर्यंतच त्यांच्या कुंडलीत हा योग असेल, त्यानंतर या पदावरून ते बाजूला होतील, अशी भविष्यवाणी पांडव यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीनुसार, जानेवारीनंतर त्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यांनंतर त्यांची राजकीय वाटचाल अगदी पूर्ववत होऊ शकते. ठाकरेंचे ग्रहमान बदलेल. त्यांचं पारडं जड होईल, असा दावा पांडव यांनी केला आहे.
केजरीवाल यांच्या कुंडलीत शुक्र, गुरु, बुध ग्रहांची दृष्टी दशम स्थानावर आहे. त्यामुळे त्यांना राजकीय जीवनात वेगळी ओळख प्राप्त होणार आहे. मात्र 2026 नंतर कुंडलीची दशा बदलेल. राजकीय जीवनात त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. केजरीवाल पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असे भविष्य सांगत असल्याचे ते म्हणाले. इतकेच नाही तर 2026 नंतर केजरीवाल मुख्यमंत्रीही होऊ शकणार नाहीत, असे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button