मुळेगाव येथे गरीब कुटुंबातील महिलांना गॅस टाकी वाटप

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली १४५ गरीब कुटुंबातील महिलांना गॅस टाकीचे वाटप करण्यात आले. यावेळी मुळेगावचे उपसरपंच शिवराज जाधव यांनी आपल्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार यांच्याकडून गरीब कुटुंबातील योजनेअंतर्गत मिळणारे लाभाची महिती दिले.
पंतप्रधान उज्ज्वल योजना, पिक विमा योजना, जन धन योजना, जन आरोग्य यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचे मोफत दवाखाना, शेतकरी सन्मान योजना व असे अनेक योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांची माहिती दिले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती नळपती बनसोडे होते. यावेळी सरपंच सविता भोसले, ग्रामसेवक आर. एस. गायकवाड, ग्रा.पं.सदस्य निलकंठ पाटील, अजमेर शेख, विनोद बनसोडे, गणेश काकडे, निर्मला शिंदे, सिमा बनसोडे, भौरम्मा माळी, मंगल खरात, सुषमा चव्हाण, अस्मिता बनसोडे, संध्या दुपारगुडे, अनिल चव्हाण, डिगंबर जाधव, गुलाब बनसोडे, सोमनाथ जाधव, अशोक काकडे, विजयकुमार बिराजदार, मल्लिनाथ माळी, रावसाहेब भोसले, पंडित भोसले, अशोक पाटील, तम्मा कारभारी, भारत कोळेकर, संतोष जाधव, सागर खांडेकर, सचिन शिंदे, उमाकांत काकडे, आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत…