ब्रेकिंग! कर्नाटकला दणका : ‘या’ गावांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे

Admin
1 Min Read

अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील २८ गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी स्थानिक विकासाच्या प्रश्नाचे निमित्त पुढे करत कर्नाटकात सामील होण्याची मागणी केली होती. या गावांनी मंजूर केलेल्या ठरावासह जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले होते. परंतु अक्कलकोटमधील ११ पैकी ३ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे. दारसंग, कलकर्जाळ आणि केगाव बुद्रुक अशा या तीन गावांची नावे आहेत.

कलकर्जाळ, शेगाव, हिळ्ळी, कोर्सेगाव, कांदेवाडी खुर्द, आळगी, मंगरूळ, धारसंग, शावळ, देवीकवठे आदी. गावांनी कर्नाटकात सामील होण्याची मागणी करणारे ठराव संमत करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले होते. सीमा भागातील या गावांमध्ये स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांपासून पायाभूत विकास झाला नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी मांडली होती. परंतु गावातील विकास कामे पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

Share This Article