महाराष्ट्र

ब्रेकिंग! सीमावादावर आता अमित शहाच अ‍ॅक्शन मोडमध्ये

सीमावादाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र-कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. संबंधित वाद सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
माझी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. महाराष्ट्राचे जे नागरिक कर्नाटकाकडे जात आहेत त्यांना कुठलाही त्रास दिला जाऊ नये. ज्यांनी गैरप्रकार केला, महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
त्यावर त्यांनी आश्वस्त केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही माझी चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत तरी दोन्ही राज्यांनी कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्यात लक्ष घालावे. दोन्ही राज्यांच्या नागरिकांना त्रास होऊ नये, अशी चर्चा झाली.
या मुद्द्यावर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्राच्या बसची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला दिले आहे. तसेच इथून पुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाही हे त्यांनी मान्य केले, असे शिंदे म्हणाले.

Related Articles

Back to top button