ब्रेकिंग! अजितदादांनी केली मोठी घोषणा

बारामतीत आज राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली.
अजितदादा कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले, आपल्या शब्दाला किंमत आली आहे. एका व्यावसायिकाने काम करायला एक कोटी दिले. बारामतीतील काम करायला पक्षाचे पैसे घातले. एकीकडे अजित सांगतो आहे आणि दुसरीकडे वरिष्ठ सांगतो आहे, कुणाचे ऐकायचे? इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले, आता माझे ऐका.
उद्या आपल्या विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान मोदींना सांगेल की, आता माझ्या लोकांनी खासदार दिला आहे. आता माझी कामे झाली पाहिजेत. आपल्या अडचणीला कोण उपयोगी येतो, याचा विचार करा, असे सांगत अजितदादा यांनी पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंच्याविरोधात दंड थोपटले.
अजितदादा म्हणाले की, आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक असणार आहे. अनेक प्रकारचे निर्णय धाडसाने घेतले. लवकरच मी महायुतीचा उमेदवार जाहीर करणार आहे. मीच उमेदवार आहे, असे समजून मतदान करा.