आपल्या सुनेमुळे बीसीसीआय नवे अध्यक्ष अडचणीत?

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आता अडचणीत सापडले आहेत. बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर माजी न्यायमूर्ती विनीत सरन यांनी बिन्नी यांना हितसंबंधांच्या वादासंदर्भात नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी बिन्नी यांना 20 डिसेंबरपर्यंत लेखी उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेल्या बिन्नी यांच्याविरोधात गुप्ता यांनी नियम 39 (2) ब अंतर्गत बिन्नी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 1983 साली जिंकलेल्या वर्ल्डकप संघात बिन्नी प्रमुख खेळाडू होते. ते हे भारताकडून खेळणारे पहिले अँग्लो-इंडियन क्रिकेटपटू आहेत.
नंतर रॉजर यांचा मुलगा स्टुअर्टनेही भारताचे प्रतिनिधित्व केले. बिन्नी 1979-87 दरम्यान भारतासाठी 27 कसोटी आणि 72 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 1979 साली पाकिस्तानविरुद्ध बंगळुरू कसोटीतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मयंती लँगर ही रॉजर यांचा मुलगा स्टुअर्ट याची पत्नी आहे. ती सध्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा स्टार स्पोर्ट्सवर अँकर म्हणून सक्रीय झाली असून याच मुद्यावरून वाद उफाळला आहे.