सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यातील 28 गावे कर्नाटकात सामील होणार?

सीमावादाची कायदेशीर लढाई जिंकण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील 28 गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील वीस गावांनी, विकासकामे होत नसल्याच्या मुद्द्यावरून कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिक महाराष्ट्र सरकारकडे रस्ते, पाणी, वीज आणि बससेवेची मागणी करत आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधी सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील 28 गावांनी विकास कामांसाठी कर्नाटकात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने शिंदे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.