मनोरंजन

विक्रम गोखले यांचे निधन, १७ दिवसांची मृत्यूशी झुंज संपली

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (७७) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते.
मात्र बुधवारपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि ते उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे कुटुंबीय त्यांच्याजवळ होते. विक्रम गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती.
त्यानंतर त्यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र यावर विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांकडून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी डोळे उघडल्याचे तसेच हातपाय हलवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय आणि रुग्णालयाकडून देण्यात आली होती. मात्र आज त्यांनी अखरेचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

Related Articles

Back to top button