देश - विदेश

मोठी बातमी! कर्नाटक पोलिसांची दडपशाही ; महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या, सीमाभागात तणाव

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्यातील वातावरण चांगलेच पेटले आहे. प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. सोलापुरातील याचे पडसाद उमटले आहेत.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बस गाड्यांना काळे फासण्याचे प्रकार घडल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. दरम्यान शनिवारी दोन्ही राज्यांच्या सीमेवरील बस गाड्या बंद ठेवण्यात आल्या. इतकेच नव्हे तर कर्नाटकच्या पोलिसांनी महाराष्ट्राच्या बस गाड्यांना सीमेवर अडविले.
त्यावरून पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटक पोलिसांनी गुलबर्गा येथील हिरोळी आणि दुधनीतील सिन्नूर जवळ काही बस गाड्या अडविल्या. परिणामी आता सीमावर्ती भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातील बसला काल कोल्हापुरात तर आज दौंडमध्ये काळे फसण्यात आले. तर आज गुलबर्गा म्हणजेच कलबुर्गी येथे महाराष्ट्राच्या गाड्यांना काळे फासण्यात आले. 

Related Articles

Back to top button