क्राईम

प्रेमात आडवा आल्याने बायकोने नवऱ्याचा काटा काढला

  1. मेरठमधील सौरभ हत्याकांडामुळे देशात खळबळ माजली असतानाच आणखी एक असा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील औरेयामध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने नवऱ्याचा काटा काढल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, लग्नाच्या १५ दिवसानंतरच नवरीने नवऱ्याचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याचा जीव घेण्यासाठी नवरीने दोन लाख रूपयांची सुपारी दिली होती. तपासानंतर पोलिसांनी नवरी आणि बायफ्रेंडला ताब्यात घेतले आहे.
  2. १९ मार्च रोजी पोलिसांना एक तरूण शेतात गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. उपचारावेळी तरूणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी सुरू केली अन् आरोपीला पर्दाफाश केला. तरूणाच्या खूनामध्ये नव्या नवरीचा हात असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले. तरूणीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
  3. मृत तरूणाचे नाव दिलीप असे आहे, तो हायड्रा चालवण्याचे काम करतो. पाच मार्च रोजी त्याचे प्रगतीसोबत लग्न झाले होते. हे लग्न प्रगतीच्या मनाविरोधात झाले होते. प्रगतीचे गावातीलच अनुराग यादव याच्यासोबत अफेअर होते. लग्न झाल्यामुळे प्रगती आणि अनुराग यांच्यात दुरावा आला. त्यामुळे प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दिलीपचा काटा काढण्याचा प्लान आखला. प्रगतीने नवऱ्याला मारण्यासाठी दोन लाख रूपयांची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक अभिजीत आर शंकर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button