सोलापूर

सोलापुरात महाविद्यालयीन स्तरापासूनच शिवसेनेचे संघटन मजबूत करणार

  • युवासेना काॅलेज कक्ष सोलापूर जिल्हा आणि शहराची बैठक युवासेनेचे काॅलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार आवताडे यांच्या अध्यक्षतेखालील सोलापूर शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
  • या युवासेना काॅलेज कक्षच्या बैठकीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर बैठकीत येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील तसेच दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक महाविद्यालयात युवासेना काॅलेज कक्ष शाखांची स्थापना करून महाविद्यालयीन स्तरापासूनच शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासंदर्भात विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली. 
  • तसेच शाखा स्थापन केल्यानंतर शाखांच्या माध्यमातून तेथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यी विद्यार्थ्यीनींचे शैक्षणिक प्रश्न आणि अडीअडचणी सोडविण्यासाठी युवासेना काॅलेज कक्षचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असतील असा विश्वास युवासेनेचे काॅलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार आवताडे यांनी व्यक्त केला.
  • यासोबतच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या मदतीला युवासेना काॅलेज कक्षाची विद्यापीठामध्ये स्वतंत्र शाखा स्थापन करण्यासंदर्भात सविस्तर करण्यात आली.
  • येणाऱ्या काळात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे बरेच विद्यार्थ्यी विद्यार्थ्यीनी मानसिक ताणतणावात असतात. त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर होतो. त्यामुळे या गोष्टी विद्यार्थ्यांनी टाळाव्यात आणि ताणतणावात न राहता एकदम शांत आणि उत्साहपूर्ण वातावरणात परीक्षा द्यावी. यासाठी युवासेना काॅलेज कक्ष सोलापूर जिल्हा आणि शहरच्यावतीने तज्ञ वक्त्यांचे व्याख्यान आणि मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन सोलापूर शहरातील आणि दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख तुषार आवताडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
  • तसेच युवासेना काॅलेज कक्षच्या माध्यमातून विद्यार्थ्यी हिताचे विविध उपक्रम राबवून वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे विचार, उध्दवसाहेबांचे विचार आणि आदित्यसाहेबांचे विचार तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसोबत काॅलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार आवताडे यांनी संवाद साधला.
  • युवासेना काॅलेज कक्ष सोलापूर जिल्हा आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या बैठकीत करण्यात आल्या. त्या खालीलप्रमाणे ———-
  • पद, नाव, कंसात कार्यक्षेत्र
  • सोलापूर जिल्हा चिटणीस 
  • रुषिकेश पवार 
  • (सोलापूर शहर उत्तर विधानसभा, शहर दक्षिण विधानसभा, शहर मध्य विधानसभा, अक्कलकोट विधानसभा)
  • सोलापूर शहर चिटणीस 
  • अभिषेक (भाऊसाहेब) सूळ
  • (सोलापूर शहर उत्तर विधानसभा, शहर मध्य विधानसभा, शहर दक्षिण विधानसभा)
  • अक्कलकोट तालुका प्रमुख 
  • योगेश फुलारी
  • (अक्कलकोट तालुका)
  • दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख 
  • आकाश साबा
  • (दक्षिण सोलापूर तालुका)
  • सोलापूर उपजिल्हाप्रमुख 
  • अनिरुद्ध दहीवडे
  • (सोलापूर शहर दक्षिण विधानसभा)
  • अनिल चिंताकिंदी
  • (सोलापूर शहर मध्य विधानसभा)
  • सोलापूर उपशहरप्रमुख 
  • सौरभ जाधव 
  • (सोलापूर शहर दक्षिण विधानसभा)
  • ओंकार काटकर
  • (सोलापूर शहर दक्षिण विधानसभा)
  • विभागप्रमुख
  • यश सुरवसे
  • (वालचंद महाविद्यालय, हिराचंद महाविद्यालय, संगमेश्वर महाविद्यालय, मंगळवेढेकर महाविद्यालय)
  • धनराज थोरात 
  • (शिवदारे महाविद्यालय, अभिजित कदम मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट, हिरालाल सोनी महाविद्यालय, ए.जी. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालय)
  • शाखाप्रमुख 
  • ओंकार भोसले
  • (संगमेश्वर महाविद्यालय)
  • अविनाश जंगलगी 
  • (ए.जी.पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालय)
  • झिशान आरेवाले 
  • (अभिजित कदम मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट)
  • उपशाखाप्रमुख 
  • राहुल वेळेकर 
  • (संगमेश्वर महाविद्यालय)
  • श्रेयस सुनकुरे 
  • (ए.जी.पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालय)
  • साबीर बागवान 
  • (अभिजित कदम मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट)
  • शाखा चिटणीस 
  • विजय वरनाळ
  • (ए.जी.पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालय)
  • या सर्वांची सर्वानुमते निवड केली आहे. तसेच
    सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा काॅलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार आवताडे आणि सोलापूर शहरप्रमुख प्रथमेश तपासे यांनी सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेनेचे काॅलेज कक्ष सोलापूर शहरप्रमुख प्रथमेश तपासे यांनीही विद्यार्थ्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
    या बैठकीस युवासेनेचे काॅलेज कक्ष सोलापूर शहरप्रमुख प्रथमेश तपासे, युवासेनेचे सोलापूर उपजिल्हाप्रमुख रुषिकेश धाराशिवकर, सोलापूर उपशहरप्रमुख अथर्व चौगुले, शंतनू सहस्रबुद्धे, विजयराज पाटील, रुषिकेश राऊत, यश राजवंश, तुषार टिकले, भरत चौधरी, अनिकेत मोरे, समर्थ पुजारी, रोहन कोरे, गणेश कोले, श्रेयस साबा, लक्ष्मीकांत कल्याणी, सागर वाघमोडे, श्रीशैल हालके, रुषिकेश जाधव, वैभव पाटील, अनुश जाधव, युवराज सुंटनूर, श्रेयश गायकवाड, प्रतिक सावंत, ध्रुव गायकवाड, आकाश ढगे, विनायक उपादे, ओंकार कोरे, योगेश आडकी, व्यंकटेश इजापल्ली यांच्यासह शिवसैनिक विद्यार्थ्यी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button