सोलापूर

U – 16 शिवबसव चषक ; के.पी.सी.सी. संघाने मारली बाजी

के.पी.सी.सी. संघाने बारामती संघाला नमवून U-16 शिवबसव चषकचे मानकरी ठरले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा अंतिम सामना के.पी.सी.सी. विरुद्ध बारामती या दोन संघात सामना झाला. बारामती संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३१.२ षटकात सर्वबाद १३८ धावा केल्या.
बारामती संघाकडुन फलंदाजी करताना अथर्व कराडे ४९ धावा केल्या व दक्ष पहाड २० धावा केले. व अथर्व काशिद २२ धावा केले. के.पी.सी.सी. संगाकडून गोलंद्जी करताना आदित्या दडे ७.००  षटकात २५ धावा देत ३ बळी टिपले. व गौरीप्रसाद स्वामी ७. षटकात ३४ धावा देत २ घडी बाद केले. यश मंगरुळे ४.२ षटकात ६ धावा देत २ घडी बाद केले. के.पी.सी.सी सगाने २६ षटकात ६ घडी गमावत १४२ धावा पुर्ण केले. त्यात लक्ष्मण मंजेली नाबाद ५२ धावा केले. व गौरीप्रसाद स्वामी २३ व समर्थ दोरनालने २३ धावा केले. बारामती संघाकडुन संगाकडून गोलंदाजी करत दक्ष पहाड ७ षटकात ४० धावा देत ३ बळी टिपले. व अथर्व काशिद ७ षटकात ३३ धावा देत २ घडी बाद केले. के.पी.सी.सी संघाने ४ घडी राखून हा सामना आपल्या नावाने केले. 
या सामन्यातील सामनावीर लक्ष्मण मंजेली यास निवड करण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हूणन आदर्श राठोड,
उत्कृष्ट गोलंदाज अथर्व काशिद, मालिकावीर आदर्श राठोडची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुणे नगरसेवक डॉ. किरण देशमुख, विरेश उंबरजे, नगरसेवक नागेश भोगडे, सिद्धार्थ सालखी, शंकर बंडगर, शाम खंडेलवाल, श्रीनिवास दायमा, प्रमोद भुतडा, महेश भंडारी ,गणेश साखरे,  सुजित पवार, अभिषेक जमादार,  प्रकाश आळगे, महेंद्र तळभंदारे, सुभाष कलशेट्टी, सागर हुनगुंद , ऋषिकेश पवार, अभिषेक काळे, राजेश काळे, अभिनव काळे, प्रेम भोगडे, नागेश येलमेली आदी उपस्थित होते. आयोजक  म्हणून राजेश येमूल, राजवर्धन जिल्ला यांनी काम पाहिले. 

Related Articles

Back to top button