क्राईम
श्रद्धा हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड: आता महाराष्ट्र पोलिसांचीच होणार चौकशी

मुंबईतील श्रद्धा वालकर यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देशाला हादरा बसला आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. यातील मुख्य आरोपी आफताबला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र कोर्टात त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली नसल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान या प्रकरणात आता मोठी घडामोड होताना दिसत आहे. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.
श्रद्धा वालकर हिच्या हत्याकांड प्रकरणात आता महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवे नाट्य निर्माण झाले आहे.
श्रद्धाने दोन वर्षांपूर्वीच आफताब विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी श्रद्धाच्या या तक्रारीची अजिबात दखल घेतली नाही. तेव्हाच जर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली असती तर आज श्रद्धा जिवंत राहिली असती, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये उमटत आहे.याची दखल खुद्द केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी घेतली असून महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील आरोपींची गय अजिबात केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



