मनोरंजन

जबरदस्त! ‘दृश्यम 2’च्या कलेक्शनने शंभर कोटींचा आकडा केला पार

अजय देवगण-तब्बू अभिनीत ‘दृश्यम 2’ रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. आज या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शानदार ओपनिंग घेऊन, रिलीज झाल्यापासून तिकीट खिडक्यांवर चित्रपटाने अपवादात्मकरित्या चांगली कामगिरी केली आहे.
आठवड्याच्या शेवटी आणखी चांगली कामगिरी करणाऱ्या चित्रपटाने सोमवारच्या परीक्षेतही चांगल्या गुणांनी यश मिळविले. मंगळवार आणि बुधवारची कामगिरीही चांगली होती. आता चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कलेक्शनचे रिपोर्ट कार्ड समोर आले आहे.
पहिल्या दिवशी १५.३८ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने शनिवारी २१.५९ कोटी रुपयांची कमाई करत आणखी चांगली कामगिरी केली. यानंतर चित्रपटाला रविवारच्या सुट्टीचा फायदा मिळाला, त्यामुळे ‘दृश्यम 2’चे कलेक्शन 27.17 कोटींवर पोहोचले.
सातव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये नक्कीच काहीशी घट झाली आहे, पण आठवड्याच्या दिवसात हे कलेक्शन समाधानकारक आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता येत्या वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि इशिता दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मल्याळम भाषेत बनलेल्या ‘दृश्यम 2’ बद्दल बोलायचे झाले तर, मोहनलाल यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट दक्षिण भारतात सुपरहिट होता.

Related Articles

Back to top button