महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्वांचे विचार मोडणाऱ्यांना अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्र-कर्नाटक वादावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. या राज्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. याआधीही मी याबाबत माझे मत मांडले आहे.
त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून जे सुरू आहे, बाळासाहेबांच्या विचारांखाली शिवसेना-भाजप युतीचे सरकार काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरली आहे. त्यामुळे हे सर्वप्रकार समोर येत आहेत, असे शिंदे यांनी म्हटले.