कार्तिक मासानिमित्त गौडगाव मठात विविध धार्मिक कार्यक्रम

Admin
1 Min Read
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बु।। येथील श्री संस्थान हिरेमठात कार्तिक मासानिमित्त प पू शिवाचार्यरत्न श्री. ष. ब्र. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात बुधवार 23 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ रोजी पहाटे सहा वाजता श्री सिद्धयोगी सिद्धमल्लेश्वर  कर्तुगदगीस महारुद्राभिषेक करण्यात येणार आहे.
सायंकाळी सहा वाजता श्री सिद्धयोगी सिद्धमल्लेश्वर गुरुगादीस क्षिराभिषक, षोडषपूजा , तांदूळ (अक्की )पूजा, पुष्पालंकार, सहस्त्र बिल्वर्चन नंतर दीपोत्सव आदी धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत. तसेच सदभक्ताकडून नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे अवाहन पंचकमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
Share This Article